सरकारकडून अपेक्षांबद्दल शिवसेना आग्रही 

मृणालिनी नानिवडेकर
शुक्रवार, 10 मार्च 2017

मुंबई - राज्य सरकारमध्ये छोट्या भावाची भूमिका निभावत असलेल्या शिवसेनेच्या काही मागण्या आहेत. या मागण्या शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून तर मतदारसंघांना निधी अशा व्यापक आहेत. भाजपच्या नेतृत्वातील सरकार आमच्या टेकूमुळे चालत असल्याची जाणीव करून देण्यासाठी शिवसेनेत सध्या दररोज बैठका, खलबते सुरू आहेत. आमच्या मागण्या पूर्ण करा, अशी आग्रही मागणी शिवसेनेचे मंत्री, प्रतोद यांची आहे. 

शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गुरुवारी सादर केले होते. त्या मागण्या पूर्ण करा, या मागणीसाठी फडणवीस सरकारमधील शिवसेनेचे मंत्री आणि प्रतोद आग्रही आहेत. अर्थसंकल्पात भाजपच्या आमदारांना झुकते माप दिले जाईल, अशी शंका व्यक्‍त करीत सरकारमध्ये राहूनही शिवसेनेवर अन्याय होत असेल तर ते योग्य ठरणार नाही, अशी भूमिका बैठकीत आमदारांनी आक्रमकपणे मांडली. कर्जमाफीच्या मागणीसंबंधी झालेल्या या बैठकीत अर्थसंकल्पीय तरतुदींचा विषय निघाला अन हातातून वेळ निघून जाण्याआधी आपल्या अपेक्षा कळवणे आवश्‍यक असल्याचे नमूद करण्यात आले. 

या मागण्या पूर्ण झाल्या तर मतदारसंघात भविष्यात वेगळे लढायची वेळ आली तर समान पातळीवर सामना होऊ शकेल, असेही मत मांडण्यात आले. मतदारसंघांचे आणि महाराष्ट्राचे रूप पालटण्यासाठी या मागण्या पुढे नेणे आवश्‍यक असल्याचेही ते म्हणाले. मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी मात्र कर्जमाफीचा विषयही या बैठकीत छेडला जाणार असल्याची माहिती दिली. विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील बदलत्या समीकरणांमुळे अस्वस्थ झालेले शिवसेना आमदार दररोज बैठका घेत आहेत. या बैठकीत शिवसेनेतील बदलांबाबत तर कधी सरकारकडूनच्या अपेक्षांबद्दलचे आग्रह धरले जातात.

Web Title: Shiv Sena about expectations from the government insists