युतीसाठी उद्धव ठाकरेंची साखरपेरणी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

मुंबई - जनतेने शिवसेना-भाजप युतीवर विश्‍वास ठेवला आहे. आगामी पाच वर्षेच नव्हे; तर पुढील 25 वर्षे आम्ही जनतेला दिलेली वचने पाळू, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता.1) केले. त्यामुळे त्यांनी मुंबई पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांची युती व्हावी, यासाठी साखरपेरणी केल्याची चर्चा आहे. 

जोगेश्‍वरी येथील गुंदवलीपासून ठाण्यातील कापूरबावडी आणि पुढे भांडुप संकुलापर्यंतच्या जलबोगद्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, 20 वर्षे लोकांनी युतीवर विश्‍वास ठेवला. लोकांनी त्यांचे भवितव्यच युतीवर सोपवले होते. निवडणुका येतात-जातात; पण युती जनतेला दिलेली वचने पूर्ण करत आहे. यापुढेही आम्ही वचन पाळू. 
युतीतील वातावरण सध्या तापले आहे. राज्यात फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या दहा महापालिकांच्या निवडणुकांसाठी युती होणार का नाही, याकडे सर्वांचे लक्ष आहे. या पार्श्‍वभूमीवर ठाकरे यांनी युती करण्याची तयारी अप्रत्यक्षपणे दाखवली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

विरोधकांवर मुख्यमंत्र्यांची टीका 
दोन दिवसांपूर्वी चेंबूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यक्रमात हाणमारी झाली होती. त्यावेळी बंदूका उंचावण्यात आल्याचा आरोपही झाला होता. हा धागा पकडून मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला टोला मारला. युती विकासाची काम करत आहे. दुसरे पक्ष बंदूका आणि तलवारी काढत आहते. हा मूलभूत फरक जनतेलाही कळतो, असे ते म्हणाले. 

'या चावीने जनतेला पाणी मिळाले' 
जलबोगद्यातील पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चावी फिरवण्यात आली. तो धागा पकडत, चाव्या मारणं सोपे असते. पण या चावीने लोकांच्या घरात पाणी गेले, अशी कोटी ठाकरे यांनी केली. 

Web Title: shiv sena- bjp-bmc