भाजपला शह देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 सप्टेंबर 2016

पणजी - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा प्रदेश संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांची आज भेट घेतली. वेलिंगकरांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत भारतीय भाषा सुरक्षा मंचतर्फे (भाभासुमं) स्थापन होणाऱ्या राजकीय पक्षाशी येत्या विधानसभा निवडणुकीत युती करण्याची शिवसेनेची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यात संघात पडलेल्या उभ्या फुटीचा फायदा घेत अप्रत्यक्षपणे भाजपला शह देण्याचे राजकारण शिवसेनेकडून सुरू असल्याचे आजच्या घडामोडींनंतर स्पष्ट झाले आहे.

दोन दिवसांच्या गोवाभेटीवर असलेल्या राऊत यांनी वेलिंगकर यांची भेट घेऊन चर्चा केली. शिवसेना वेलिंगकरांच्या पाठीशी असल्याचे राऊत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. तत्त्वांशी तडजोड न करणाऱ्या वेलिंगकर यांना संघाने प्रांत संघचालक पदावरून हटविल्यानंतर त्यांना आपला पाठिंबा असल्याचे शिवसेनेने यापूर्वीच जाहीर केला होते. आपण त्यांची प्रत्यक्षात भेट घेऊन पक्ष त्यांच्या पाठीशी राहील, असे आश्‍वासन दिल्याचे राऊत यांनी या वेळी सांगितले.

मातृभाषेशी तडजोड न करण्यावर वेलिंगकर ठाम राहिले असून, त्यामुळेच त्यांच्या मेळाव्याला दोन हजारांहून अधिक स्वयंसेवक, नागरिकांची उपस्थिती असल्याचा दावा राऊत यांनी केला. गोव्यात दोन हजारांची उपस्थिती ही मोठी गोष्ट असल्याचे राऊत म्हणाले. ""तत्त्वांशी तडजोड करणाऱ्या भाजप नेत्यांवर आरोप केल्यामुळे वेलिंगकर यांना एकाकी पाडण्याचे प्रयत्न झाले; परंतु त्यानंतरच्या घडामोडी पाहता विधानसभा निवडणुकीत नक्कीच त्याचे परिणाम होतील असे दिसते. वेलिंगकर यांच्यासमवेत असलेले लोक भाजपच्या गोव्यातील उदयास, सत्तास्थानी येण्यास कारणीभूत आहेत,‘‘ असे राऊत म्हणाले. 

"भाभासुमं‘तर्फे स्थापन होणाऱ्या नव्या राजकीय पक्षाबरोबर शिवसेना युती करेल का? असे विचारता राऊत म्हणाले की, जर शिवसेना व "भाभासुमं‘चे तत्त्व - ध्येय एकच असेल तर निवडणुकीत युतीची तयारी शिवसेनेने दर्शविली आहे. पुढील टप्प्यात युतीसंदर्भात चर्चा होईल. 

शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी गोव्यात 20 मतदारसंघांसाठी उमेदवार जवळजवळ निश्‍चित केले असून, युती झाल्यास प्रसंगी तडजोडीसाठी आम्ही तयार आहोत, असे राऊत यांनी सांगितले. 

Web Title: Shiv Sena tried to checkmate the BJP