महाराष्ट्र भवनाचा शिवसेनेला विसर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

मुंबई - मुंबईत महाराष्ट्र भवन बांधण्याचा शिवसेनेला विसर पडला आहे. त्याबाबतची ठरावाची सूचना पालिकेच्या विधी समितीच्या बैठकीत मांडण्यात आली होती; मात्र पालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही ठरावाच्या सूचनेवर कार्यवाही होऊ शकलेली नाही. त्याबाबत मनसेने शिवसेनेवर ठपका ठेवला आहे. मुंबईच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या 236 ठरावांच्या सूचना काही वर्षांत सभागृहात आणि वैधानिक समितीत मांडल्या गेल्या; मात्र त्या धूळ खात असल्याची टीका मनसेने केली आहे. 

विधी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत 20 ठरावांच्या सूचनांवर आठ दिवसांत अभिप्राय सादर करण्याचे आश्‍वासन पालिका प्रशासनाने दिले आहे. 236 ठरावांच्या सूचना कार्यवाहीविना पडून आहेत. त्यात महाराष्ट्र भवनाचा समावेश आहे. 

शिवसेनेची पालिकेत सत्ता असूनही शिवसेनेला महाराष्ट्र भवन बांधण्याच्या ठरावाची सूचना मंजूर करता आलेली नाही. त्यामुळे या भवनाचा त्यांना विसर पडला आहे, अशी टीका मनसेने केली आहे. प्रलंबित ठरावाच्या सूचनांवर प्रशासनाने तातडीने अभिप्राय द्यावेत, अशी मागणी लांडे यांनी केली आहे. 

चाफेकर बंधूंचा इतिहास पालिकेकडे नाही 
स्वातंत्र्याच्या चळवळीतील चाफेकर बंधूंच्या देशकार्याचा इतिहास महापालिकेकडे नाही. ठरावाच्या सूचेनला प्रशासनाने तसे उत्तर दिले आहे. याबाबतच्या ठरावाच्या सूचनेला विलंब झाल्याबद्दल तशी सारवासारव पालिका प्रशासन करत असल्याचा आरोप गटनेते दिलीप लांडे यांनी केला.