विदेशातील काळे धनही लवकरच देशात येईल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

नगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा जो निर्णय घेतला, त्याचा देशातील नागरिकांना थोडासा त्रास सहन करावाच लागेल; मात्र त्यानंतर देशातील अर्थव्यवस्था अधिक सुरळीत होण्यास मदत होईल. पंतप्रधानांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वसामान्य देशवासीयांनी स्वागतच केले आहे, असे योगगुरू रामदेवबाबा यांनी मंगळवारी सांगितले. विदेशातील काळा पैसाही लवकरच देशात आणला जाईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

येथे आयोजित योग शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी रामदेवबाबा बोलत होते. ते म्हणाले, ""देश व विदेशात लपवून ठेवलेले दहा लाख कोटी रुपयांचे काळे धन या निर्णयामुळे बाहेर पडेल. यामुळे चीन व अमेरिकेपेक्षाही भारताची अर्थव्यवस्था अधिक सुदृढ होईल. भारताला परदेशी गुंतवणुकीची गरज भासणार नाही. पंतप्रधानांनी आता दहशतवाद्यांशी युद्ध छेडले आहे. त्यामुळे त्यांना देशवासीयांची साथ हवी आहे. मोठ्या किमतीच्या नोटा बंद झाल्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल. त्यामुळे सामान्य माणसाला न्याय मिळेल. नोटा बंद केल्यामुळे सध्या सर्व लोकांना थोडा त्रास होत आहे; परंतु राष्ट्रहितासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे.''