ST Strike: आंदोलन थांबविण्यासाठी समिती नेमण्याची सूचना

मंत्री, आमदारांचा समावेश करून पुढील आठवडाभरात समिती नेमण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
Ramraje Naik-Nimbalkar
Ramraje Naik-Nimbalkaresakal

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांचे संप मिटविण्यासाठी कोणीही पुढाकार घ्या. तो आता थांबलाच पाहिजे, असे सांगून त्यासाठी विधानसभा, विधान परिषदेतील सदस्यांची विशेष समिती नेमण्याची सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मंगळवारी केली. मंत्री, आमदारांचा समावेश करून पुढील आठवडाभरात समिती नेमण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

एसटीच्या विलनीकरण, त्यासंदर्भातील समितीचा अहवाल, राज्य सरकारची भूमिका आणि विरोधकांची मागण्यांचे पडसाद अजूनही अधिवेशनात उमटत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज पुन्हा विधान परिषदेत चर्चा झाली. संपावर तोडगा निघत नसल्याने प्रवाशांची हाल होत आहेत. शाळा, महाविद्यालये सुरू असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याकडे डॉ. परिणय फुके यांनी लक्षवेधले. संप मिटण्याची अपेक्षा मांडून, प्रवाशांची सोय करण्यासाठी पुढाकार घेण्याची सूचना नाईक-निंबाळकर यांनी केली.

Ramraje Naik-Nimbalkar
पाच अल्पवयीन मुलींवर लैंगिक आत्याचार; 50 वर्षीय 'अंकल'वर गुन्हा

विद्यार्थ्यांची सोय करण्याची ग्वाही

सरकारची बाजू मांडताना परब म्हणाले, ‘‘नव्याने समिती नेमून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली जाईल. मात्र, आता कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटीच्या सेवेत अडचणी येत आहेत. परंतु, या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून प्राधान्याने बसगाड्या रस्त्यावर आणण्याला प्राधान्य आहे. ''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com