एसटीचे दोन कोटी थकले - दिवाकर रावते

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

नागपूर - राज्य परिवहन महामंडळाचे विविध खात्यांकडे तब्बल दोन हजार कोटी रुपये थकीत आहेत. ते वसूल करण्याची जबाबदारी परिवहन विभागाने स्वीकारली आहे. कोणत्या विभागाला कोणत्या सवलती द्यायच्या याबाबत आराखडा तयार केला जात असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली. 

भाई गिरकर यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावर रावते म्हणाले, ""राज्यात साडेतीन हजार चालकांची भरती केलेली आहे. कोकणासाठी वेगळी स्वतंत्र भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा कालावधीही एक वर्षाचा केला आहे. पूर्वी तो दोन वर्षांचा होता. त्यामुळे कर्मचारी व अधिकारी रुजू होण्यास वेळ होत असल्याने हा कालावधी कमी केला आहे.'' लांब पल्ल्याच्या कोणत्याही बस बंद केलेल्या नाहीत. त्यात सुधारणा करण्यात येत आहे. जिल्ह्यात अधिकाधिक गाड्या सोडल्या जाणार आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या वातानुकूलित होत असून, अशा दोन हजार बस घेण्यात येणार आहेत. मार्च महिन्यापर्यंत परिवहन ंमंडळाच्या ताफ्यात या गाड्या येतील, असेही परिवहनमंत्री यांनी सांगितले.