मार्चचाही पगार थकीत! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

मुंबई  - शालार्थ प्रणालीच्या दुरुस्तीच्या नावाखाली शिक्षण विभागाने अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार थकवण्याचा प्रकार सलग तिसऱ्या महिन्यातही सुरूच ठेवला. एप्रिलचा दुसरा आठवडा उजाडला तरी शिक्षकांना मार्च महिन्याचा पगार देण्यात आलेला नाही. 

सुरवातीला शालार्थ ही वेतन प्रणाली बंद पडल्याचा वाद गाजल्यानंतर एप्रिलपर्यंतचे पगार ऑफलाइन दिले जातील, असे आश्‍वासन शिक्षण विभागाने फेब्रुवारीमध्ये दिले होते. तरीही निम्मा फेब्रुवारी संपल्यानंतर पगार मिळाला. युनियन बॅंकेतून पगार देण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्याचे शिक्षण विभागाने ठरवले. त्यामुळे फेब्रुवारीचा पगार देतानाही शिक्षण विभागाची रडारड सुरू होती. शिक्षण विभागाने मार्चमध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने युनियन बॅंकेच्या माध्यमातूनच पगार देण्याचे निर्देश दिले. अधिवेशनातही शिक्षकांचा पगार युनियन बॅंकेतून केला जाईल, असे आश्‍वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. मात्र मार्चच्याही पगाराला विलंब झाल्याने शिक्षक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे कर्जाची थकबाकी आणि महत्त्वाच्या खर्चाची तरतूद करताना शिक्षकांची आर्थिक कोंडी होत आहे. 

Web Title: Teacher salary is not paid for March