शिवसेना मंत्र्याच्या गैरहजेरीत ठाकरे स्मारक विधेयक मंजूर 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 मार्च 2017

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे विधेयक आज विधानसभेत मंजूर झाले. शिवसेना मंत्री गैरहजर असताना हे विधेयक चर्चेला आले व मंजूर झाले त्यावरून सभागृहात व राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. महापौर निवासात हे स्मारक होणार आहे. 

नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी महानगरपालिका सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे विधेयक मांडले. या वेळी शिवसेना मंत्री उपस्थित नसल्याने राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांनी हे विधेयक चर्चेविना मंजूर करा, असा टोला लगावला. तर जयंत पाटील यांनी खुमासदार शैलित भाजपच्या कुटनीतीचा संदर्भ जोडत मार्मिक टोलेबाजी केली. 

शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाझे व चंद्रकांत सोनावणे यांनी या विधेयकाचे स्वागत करत सरकारचे अभिनंदन केले. तर मनसेचे आमदार शरद सोनावणे यांनीही विधेयकाला समर्थन देत अभिनंदन केले. 

कॉंग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी विधेयकाच्या समर्थनार्थ भाषण करत सरकारचे अभिनंदन केले. तर भाजपचे राज पुरोहित यांनी बाळासाहेब ठाकरे हे देशाच्या अस्मितेचे प्रतीक होते, अशी भावना व्यक्त केली.