राज ठाकरे आज भूमिका मांडणार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतच्या युतीचा प्रस्ताव ठोकरल्यानंतर धास्तावलेल्या भाजपला शिवसेना-मनसेतील घडामोडींमुळे दिलासा मिळाला आहे. मराठी अस्मिता आणि मतविभागणी टाळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला युतीचा नवा प्रस्ताव ठाकरे यांनी नाकारल्याने भाजपच्या मनात उकळ्या फुटल्या आहे. शिवसेना-मनसेतील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांचा बुधवारी (ता. 1) शिवाजी मंदिर येथे मेळावा आयोजित केला आहे. या वेळी ते कोणती भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

शिवसेना-भाजप युती, दोन्ही कॉंग्रेसची आघाडी आणि शिवसेना-मनसेच्या नव्या युतीचा प्रयत्न या सर्व शक्‍यता संपुष्टात आल्याने राज्यातील हे प्रमुख चार राजकीय पक्ष स्वतंत्र निवडणुका लढविणार आहेत. 

शिवसेना भाजपची युती फिस्कटल्यानंतर शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. दहा महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या स्वतःच्या ताकदीवर लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. स्वबळामुळे मुंबई, ठाणे जिंकण्यासाठी शिवसेनेला कोणतीही अडचण नसल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे. शिवसेनेच्या मुंबईतील कॅडरचा उपयोग करून घेत ताकद वाढविण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र युती तुटल्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले होते. 

गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जबरदस्त पीछेहाट झालेल्या मनसेने दोन दिवसांपूर्वी शिवसेनेकडे युतीचा बिनशर्त प्रस्ताव पाठवला. मराठी मतांचे विभाजन टाळण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न असल्याचे बाळा नांदगावकर यांनी शिवसेना नेत्यांना सांगितले होते. याचा सर्वाधिक फायदा शिवसेनेलाच होणार असल्याचे विधान नांदगावकर यांनी केले. मात्र उद्धव ठाकरे यांनी एकट्यानेच लढण्याचा निर्णय जाहीर केला. या घटनांचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले असून मनसेनेही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. युतीच्या प्रयत्नाआधी मनसेने मुंबईत 150 च्या आसपास जागा लढण्याचा निर्णय घेतला होता. उर्वरित ठिकाणी शिवसेनेला आतून मदत करण्याचा मनसेचा प्रयत्न होता. मात्र आता जास्तीत जास्त लढण्यावर मनसे आता ठाम असल्याचे समजते. 

मुंबई महापालिकेल्या गेल्या निवडणुाकीत शिवसेनेचे अनेक उमेदवार 50 ते 300 मतांच्या फरकाने पराभूत झाले होते. आता मनसेसोबत असती तर शिवसेनेच्या पारड्यात 114 ते 115 जागा मिळाल्या असत्या, असे मनसे नेत्यांचे म्हणणे आहे. शिवसेना मनसेतील घडामोडींमुळे या दोन्ही पक्षांचा मतदार संभ्रमावस्थेत जाणार असून मतविभागणीही होणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजपला फायदा होण्याची शक्‍यता असल्याने भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

दरम्यान, शिवसेनेशी युती करण्याच्या घडामोडींवर राज ठाकरे उद्या पहिल्यांदाच भाष्य करणार आहेत. या वेळी मनसेच्या उमेदवारांची यादी घोषित होण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेने युती करण्याचे फेटाळल्यानंतर आज दिवसभर राज ठाकरे यांनी इच्छुकांशी संवाद साधला. पक्षात सुरू असलेल्या नगरसेवकांच्या गळतीवर राज ठाकरे काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Today Raj Thackeray tell role