शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला उद्धव ठाकरेंची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

मुंबई - अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबरला होणार असून, या कार्यक्रमाला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील व विनोद तावडे यांनी आज (बुधवार) मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण स्वीकारले असून, ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दिलजमाई हा शब्द तेव्हाच येतो, जेव्हा अंतर निर्माण झालेले असते, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

शिवस्मारकाचे भूमिपूजन करून भाजप "शतप्रतिशत' राजकीय श्रेय घेण्याच्या तयारीत आहे. मोदी यांच्या हस्ते येत्या 24 डिसेंबर रोजी भूमिपूजन करून मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ भाजप फोडणार असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. पालिकेच्या 2012मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होऊन जागावाटप झाले होते. मात्र, यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप केंद्रात आणि राज्यात सत्तेत आला. मात्र, विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. त्यानंतर झालेल्या कल्याण-डोंबिवली निवडणुकीतही हे दोन्ही पक्ष वेगळे लढले. सत्तेत मात्र एकत्र आले. त्याच धर्तीवर मुंबई महापालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष वेगळे लढणार असल्याचे सांगितले जाते.