विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? दिपाली सय्यद संभ्रमात

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? दिपाली सय्यद संभ्रमात
esakal

सन्माननीय एकनाथ शिंदे (Eknath Shinde)साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? अशा सवाल दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी ट्विटवर केला आहे.

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? दिपाली सय्यद संभ्रमात
एकनाथ शिंदेंच्या गटात आमदार का निघालेत हे लवकरच समजेल - संजय राऊत

महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi Government) राजकीय उलथापालथ सुरूच आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारवर नाराज आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी वर्षां बंगला सोडत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले आहेत.

या सर्व घडामोडीनंतर दिपाली सय्यद यांच्यासमोर मोठ पेचप्रसंग उभा राहिला आहे. त्यांनी त्यांच्या मनातील खंत ट्विटरवर व्यक्त केली आहे.

काय म्हणाल्या आहेत ट्विटमध्ये ?

सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्विकार करू.

असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? दिपाली सय्यद संभ्रमात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याआधी सचिवांचे आभार मानणार?

माझ्यामांशी बोलताना दीपाली सय्यद भावूक झाल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी वर्षा हे निवासस्थान सोडल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या संवाद साधला. उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे हे राम-लक्ष्मणाची जोडी आहे. ती तुटता कामा नये, असे भावूक वक्तव्य त्यांनी यावेळी केले होते.

दीपाली सय्यद यांनी 3 ऑक्टोबर 2019 च्या निवडणूकीवेळी रात्री उशिरा मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि हातावर शिवबंधन बांधून घेतले.

ठाणे जिल्ह्यातील कळवा मुंब्रा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादीची या भागातील 'हॅट्रीक' मोडण्यासाठी शिवसेनेचे कळवा - मुंब्रा मतदारसंघातून दीपाली भोसले - सय्यद यांना उमेदवारी देण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com