जिल्हा परिषदेतील युतीचा निर्णय स्थानिक नेत्यांवर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

मुंबई - उत्तर भारतातील मोदीलाटेची दखल घेत शिवसेनेने स्वतंत्र बाणा जपणारे दोन निर्णय घेतले आहेत. राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसशी हात मिळवणी केल्याचा कथित निर्णय शिवसनेने बासनात बांधला असून आता स्थानिक नेत्यांनी युतीबाबत निर्णय घ्यावा, असा आदेश देण्यात आला आहे. 

महापालिका निवडणुकांनंतर भाजपचा कडवट विरोध करण्याच्या धोरणापासून घेतलेली ही फारकत असून, सरकारशी सामोपचाराने जुळवून घेण्याची गरज नेत्यांच्या लक्षात आल्याची प्रतिक्रिया भाजप गोटातून व्यक्‍त केली जाते आहे. मात्र, भाजपच्या या सुनामीत विरून जाण्याऐवजी स्वतंत्र अस्तित्व आणि पक्षाची बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच राज्याचा दौरा करणार आहेत. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांत शिवसेनेचे नेतृत्व मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीत लक्ष देत राहिले. त्यामुळे आता ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित करत तिथेही शिवसेना बळकट करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. निकालापूर्वी आदल्या दिवशी ठाकरे यांनी "झाले गेले विसरण्याची' भाषा प्रथमच केली. त्यामुळे आता भाजपशी असणारे संबंध "तुटेपर्यंत ताणायचे नाहीत' या मतापर्यंत "मातोश्री' पोचल्याचे समजते.