जनता ऐक्‍याच्या प्रयत्नाला महाराष्ट्रातून सुरवात 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

मुंबई - देशात पुन्हा एकदा तिसरा पर्याय उभा करण्यासाठी विखुरलेल्या जनता परिवाराला एकत्र करण्याचा बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) राष्ट्रीय अध्यक्ष नितीशकुमार यांचा निर्धार आहे. महाराष्ट्रातील लोकभारतीचे "जेडीयू'मधील विलीनीकरणाने त्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. त्यासाठी नितीशकुमार यांनी "जेडीयू'चे राष्ट्रीय महासचिव श्‍याम रजक यांना पाठवले होते. पश्‍चिम भारतात ही प्रक्रिया लवकरच वेग घेईल, असा विश्वास रजक यांनी व्यक्त केला आहे. 

कालच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेत प्रसिद्ध गीतकार हसन कमाल, कामगार नेते शशांक राव, कॅथलिक महासभेचे अध्यक्ष डॉल्फी डिसोजा, मुस्लिम समाजाचे नेते गुलाम नबी अन्सारी, मेहमूद ठाणावाला, राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त डॉ. सुरेश खैरनार आदी उपस्थित होते. लोकभारतीचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी स्वतः विलीनीकरणाचा प्रस्ताव मांडला; तर महासचिव अतुल देशमुख यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर महाराष्ट्र "जेडीयू'च्या संयोजकपदी कपिल पाटील यांची नेमणूक केल्याचे नितीशकुमार यांचे पत्र श्‍याम रजक यांनी पाटील यांना दिले. 

नितीशकुमार हे स्वतः एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात येत आहेत. त्याआधी पाटील आणि शशांक राव राज्याचा दौरा करणार आहे. राज्यातील पुरोगामी आणि समाजवादी चळवळीतील सर्व गटांनाही एकत्र करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.