सार्वजनिक वाहतुकीसाठी विजेवरील वाहनांचा वापर : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

मुंबई : विजेवर चालणाऱ्या वाहनांचा (ई-व्हेइकल) वापर वाढविण्यासाठी राज्य शासनाने आज मोठे पाऊल उचलले असून, या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय पर्यावरण, वनमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र शासन आणि टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा व इइएसएल या कंपन्यांसोबत पाच महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले. पुढील काळात शासकीय वापरासाठीची, तसेच महानगरांमधील सार्वजनिक वाहतुकीसाठी ई-व्हेईकलचा वापर वाढविणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी केली. 

Web Title: Use of electric vehicles for public transport says CM