शरद पवार यांचे मत कोणाला?

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

'त्या' वॉर्डमधील प्रमुख पक्षांचे उमेदवार
अरविंद बने : शिवसेना
धनराज नाईक : मनसे
कौशिक शहा : काँग्रेस
सरिता पाटील : भाजप

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (मंगळवार) सकाळी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महालक्ष्मी येथील वॉर्ड क्रमांक 214 मधील केंद्रावर मतदान केले. मात्र, येथे त्यांच्या पक्षाचा उमेदवार नसल्याने पवार यांनी कोणाला मतदान केले, याबाबत मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता असून तर्कवितर्कांना उधाण आले आहे. 

देशाच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असणारे आणि ज्यांच्या राजकीय डावपेचांबद्दल तर्क लढविणे, अंदाज वर्तविणे तज्ज्ञ विश्लेषकांनाही कठीण जाते असे नेते म्हणून शरद पवार ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षाचा पर्याय नसताना नेमके कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला आपलं बहुमूल्य मत दिलं असेल याबाबत अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. 

पवार यांनी मतदान केलेल्या वॉर्डमधून भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि मनसे या पक्षांचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. महालक्ष्मी मंदीर, जसलोक हॉस्पिटल आणि ऐतिहासिक गोवालिया टँक मैदान अशी महत्त्वाची ठिकाणे या वॉर्डमध्ये आहेत. येथून एकूण नऊजण निवडणूक लढवत आहेत. 

मतदान केल्यानंतर स्वतःच्या मताबद्दल न बोलता तिथून पुढे जाणे पवार यांनी पसंत केले. पवार यांना नुकताच पद्मविभूषण हा देशातील दुसरा सर्वोच्च सन्मान जाहीर करण्यात आला आहे. पवार यांनी यावेळी जावई सदानंद सुळे आणि नात रेवती यांच्यासह जाऊन मतदान केले. 

 

महाराष्ट्र

मुंबई - मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीला...

04.21 AM

मुंबई : आजच्या बैठकीत फक्त संघटनात्मक चर्चा होईल. मंत्रिमंडळ फेरबदल किंवा तुम्हाला अपेक्षित असलेली चर्चा आजच्या बैठकीत...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

नाशिक : कोपर्डीतील सामुहिक अत्याचार व खून प्रकरणातील संशयीत आरोपींनी विशेष सरकारी वकिलांची साक्ष घेण्याविषयी केलेली याचिका...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017