कंगना राणावत चित्रीकरणादरम्यान जखमी; "आयसीयु'त दाखल

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 जुलै 2017

या दृश्‍यामध्ये तलवार युद्ध करत असलेल्या कंगनाने प्रतिस्पर्ध्याचा तलवारीचा वार चुकवत खाली वाकणे अपेक्षित होते. मात्र ही कृती योग्य वेळी करण्यात न आल्याने कंगना जखमी झाली. कंगनाच्या भुवयांजवळ तलवारीची मोठी जखम झाली असून तिला 15 टाके पडले आहेत

हैदराबाद - प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत हिला आज (गुरुवार) एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अपघात झाल्याने तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

झाशीच्या राणीवरील या चित्रपटाच्या चित्रीकरणादरयान तलवारीच्या युद्धाचा एक प्रसंग चित्रित करण्यात येत होता. या दृश्‍यामध्ये तलवार युद्ध करत असलेल्या कंगनाने प्रतिस्पर्ध्याचा तलवारीचा वार चुकवत खाली वाकणे अपेक्षित होते. मात्र ही कृती योग्य वेळी करण्यात न आल्याने कंगना जखमी झाली. कंगनाच्या भुवयांजवळ तलवारीची मोठी जखम झाली असून तिला 15 टाके पडले आहेत. तिला तत्काळ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तिला पुढच्या आठवड्यापर्यंत "डिस्चार्ज' दिला जाण्याची शक्‍यता आहे.

या चित्रपटामधील सर्व साहसी दृश्‍ये "डमी' न वापरता स्वत:च चित्रित करण्याचा निर्णय कंगनाने घेतला आहे.