मराठवाड्याचे सिंचन क्षेत्र 18 वरून 40 टक्‍यांपर्यंत नेऊ 

राजेभाऊ मोगल
सोमवार, 25 जून 2018

औरंगाबाद : "मराठवाड्याचे सिंचन केवळ 17 ते 18 टक्‍के एवढेच आहे. हा सर्वांत गंभीर प्रश्‍न आहे. येत्या काळात हा आकडा 40 टक्‍यापर्यंत घेऊन जायचा आहे. यासोबतच शिक्षण, आरोग्य यासह अन्य प्रश्‍न सोडविण्यासाठी भरीव निधी आणण्याचे प्रयत्न केले जातील'', अशी ग्वाही मराठवाडा विकास मंडळाचे नवनियुक्‍त अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी दिली.

मराठवाडा विकास महामंडळाला नऊ वर्षानंतर डॉ. कराड यांच्या रुपाने अध्यक्ष लाभले आहेत. सोमवारी (ता. 25) त्यांनी अध्यक्षपदाचा पदभार घेतला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, "या भागाचा विशेष विकास व्हावा, यासाठीच आपण काम करणार आहोत. मराठवाड्यात सिचंनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. आजघडीला 17 ते 18 टक्के एवढेच सिंचनाचे प्रमाण आहे, ते 40 टक्‍क्‍यावर नेण्याचा आपला मानस आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेच जलसंधारण खाते असल्यामुळे राज्यासाठी दिलेल्या 40 हजार कोटींपैकी अधिकाधिक निधी मराठवाड्याला कसा मिळेल यावर माझा भर राहील. डीएमआयसीमध्ये मोठे उद्योग, गुंतवणूक, औरंगाबाद, जालन्याप्रमाणेच मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये औद्योगिक विकास, आरोग्य व वैद्यकीय सुविधा आणखी उत्तमरीत्या पोचवण्यासाठी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. 

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराला पर्यटन राजधानीचा देखील दर्जा आहे. परंतु तशा सुविधा, पर्यटकांसाठी विमानांची कनेक्‍टीव्हीटी या गोष्टी उपलब्ध नाहीत. भविष्यात पर्यटकांसाठी औरंगाबादेतून देशभरातील पर्यटनस्थळांना जोडणारी विमानसेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल. शिवाय विभागाचा विकास आराखडा तयार करणे, कार्यन्वित योजनांचे पर्यवेक्षण, सनियंत्रण व मूल्यमापन, मंडळ कार्यालयांचे बळकटीकरण, सामूहिक गट शेतीवर भर देऊन शेतकऱ्यांना स्वतंत्र पॅकेज देण्याचा प्रयत्न असेल'', असेही डॉ. कराड यांनी स्पष्ट केले.

Web Title: From 18 to 40% of Marathwada irrigation area