मराठवाड्यातील 28 गावे तंटामुक्त 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

जालना - महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेअंतर्गत वर्ष 2015-16 मधील तंटामुक्त गावांची घोषणा शासनातर्फे करण्यात आली आहे. राज्यातील 154 गावे तंटामुक्त म्हणून घोषित करण्यात आली असून, मराठवाड्यातील 28 गावांचा यामध्ये समावेश आहे. पात्र ठरलेल्या गावांना एकूण तीन कोटी 95 लाख रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. 

जालना - महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेअंतर्गत वर्ष 2015-16 मधील तंटामुक्त गावांची घोषणा शासनातर्फे करण्यात आली आहे. राज्यातील 154 गावे तंटामुक्त म्हणून घोषित करण्यात आली असून, मराठवाड्यातील 28 गावांचा यामध्ये समावेश आहे. पात्र ठरलेल्या गावांना एकूण तीन कोटी 95 लाख रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. 

गावात तंटे होऊ नयेत, सामाजिक शांतता प्रस्थापित होऊन राज्याची समृद्धीकडे वाटचाल व्हावी या उद्देशाने 15 ऑगस्ट 2007 पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविण्यात येते. याअंतर्गत राज्यात आतापर्यंत 18 हजार 993 गावांना तंटामुक्त पुरस्कार देण्यात आला आहे. तर एक हजार 298 गावांना विशेष शांतता पुरस्कार देण्यात आला आहे. मोहिमेच्या नवव्या वर्षातील अंमलबजावणी कार्यक्रमानुसार 15 ते 30 ऑगस्ट 2016 या कालावधीत राज्यातील 154 ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन या मोहिमेत सहभाग घेतला होता. या मोहिमेंतर्गत तंटामुक्त गाव समितीने तंटे लोकसहभागातून सामोपचाराने मिटविण्याची कार्यवाही केली आहे. त्यानुसार या गावांना सन 2001 च्या जनगणनेप्रमाणे गावाच्या लोकसंख्येनुसार पुरस्कारांची रक्कम मिळणार आहे. तर विशेष शांतता पुरस्कार मिळालेल्या 11 गावांना पुरस्कार रकमेच्या 25 टक्के इतकी वाढीव रक्कम मिळणार आहे. 

मराठवाड्यातील या गावांचा समावेश 
औरंगाबाद जिल्ह्यातील किनगाव, वारेगाव (ता. फुलंब्री), घोडेगाव, भालगाव, वरझडी, फुलशिवरा (ता. गंगापूर), मंगरूळ, सांजखेडा, टाकळीमाळी (ता. करमाड) या गावांचा समावेश आहे. उस्मानाबादमधील येडशी, चिलवडी, जहागीरदारवाडी, बामणीवाडी (ता. उस्मानाबाद), बोरगाव, फुलवाडी (ता. तुळजापूर) ही गावे आहेत. विशेष शांतता पुरस्कारासाठी तुरोरी व तलमोड, महालिंगरायवाडी (ता. उमरगा) या गावांची निवड झाली. परभणी जिल्ह्यातील धारासूर (ता. सोनपेठ), टाकळगव्हाण (ता. परभणी) यासह विशेष शांतता पुरस्कार आनंदवाडी (ता. पालम), वझूर (ता. गंगाखेड) या गावांना आहे. हिंगोलीमध्ये बोरखेडी (पी) (ता. सेनगाव), इंचा, लोहगाव, लिंबाळा सरहद, बोराळा (ता. हिंगोली), जवळा बु. (ता. वसमत) या गावांचा समावेश आहे. नांदेड, जालना व बीड जिल्ह्यातील एकाही गावाने स्वयंमूल्यमान अहवाल सादर न केल्यामुळे जिल्हाबाह्य मूल्यमापन अहवाल निरंक राहील. परिणामी वर्ष 2015-16 मध्ये सहभागी एकही गाव तंटामुक्त झाले नाही. 

Web Title: 28 village tantamukat marathwada