महापौरांविरोधात भाजपच्या 32 नगरसेवकांचे बंड

महापौरांविरोधात भाजपच्या 32 नगरसेवकांचे बंड

लातूर : लातूर महापालिकेच्या महापौरांनी बुधवारी आयोजित केलेल्या  सर्वसाधारण सभेकडे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या 39 पैकी 32 नगरसेवकांनी पाठ फिरवीत महापौरांविरोधात एक प्रकारे बंड पुकारल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी नगरसेवकच गैरहजर राहिल्याचे पाहून काँग्रेसच्या नगरसेवकांनीही संधी सोडली नाही. त्यांनी या सभेवर बहिष्कार टाकला. महापालिकेच्या व पूर्वीच्या पालिकेच्या इतिहासात सत्ताधाऱी  नगरसेवकामुळे महापौरांवर सभा रद्द करण्याची नामुश्कीची ही पहिलीच वेळ ठरली. अर्ध्यातासाच्या आतच महापौर सुरेश पवार यांनी काही अपरिहार्य कारणामुळे  आजची सभा रद्द करण्याची घोषणा केली.

गेल्या काही दिवसापासून महापालिकेतील भारतीय जनता पक्षातील मतभेद आता 
चव्हाट्यावर येत आहेत. मंगळवारी देखील स्थायी समितीची सभा सत्ताधारी भाजपचेच नगरसेवक न आल्याने रद्द करण्याची नामुश्की आली होती. त्यामुळे बुधवारी महापौर सुरेश पवार यांनी बोलावलेल्या सर्वसाधारण सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या सभेला भाजपचेच नगरसेवक गैरहजर राहणार असल्याची चर्चाही कालच सुरु झाली होती. ती आजच्या उपस्थितीवरून खरीही ठरली. येथील डीपीसी हॉलमध्ये दुपारी तीन वाजता सभेला सुरवात झाली. 

या सभेला  महापौर सुरेश पवार, स्थायी समितीचे सभापती शैलेश गोजमगुंडे, नगरसेवक शैलेश स्वामी, संगीत रंदाळे, ज्योती अवसकर, श्वेता लोंढे, शितल मालू असे सातच भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. महापालिकेत भाजपचे निव़डूण आलेले 36 व स्विकृत 3 असे 39 सदस्य आहेत. या पैकी ३२ नगरसेवकांनी या सभेला गैरहजर 
रहात महापौर सुरेश पवार यांच्यावर एक प्रकारे अविश्वास दाखवला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com