अधिक मासासाठी गेलेल्या जावयावर काळाचा घाला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

बीड : सध्या अधिकमास असल्याने धोंंडे जेवणासाठी सासरवाडीला निघालेल्या जावयाच्या कारचा गेवराई तालुक्यातील लोनवळ येथील वळणावर विचित्र अपघात गुरूवारी (ता. 24) पहाटे झाला. या अपघातामध्ये जावई ठार झाला तर पत्नी व ड्राईव्हर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

शिवाजी जगनाथ व्यवहारे (वय 30, रा. औरंगाबाद) असे अपघातात मृत पावलेल्यांचे नाव आहे. व्यवहारे हे औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. गुरूवारी ते पत्नी राधा यांच्यासह माजलगाव तालुक्यातील खेर्डा येथे सासरवाडीला मारूती कार मधून निघाले होते.

गेवराई तालुक्यातील लोनवळ फाटा येथे वळणावर आल्यानंतर चालक अन्वर शेख याचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या पोलवर कार जाऊन धडकली. यामध्ये शिवाजी व्यवहारे हे कारच्या बाहेर रस्त्याच्या कडेला फेकले गेले. कारने तीन पलट्या मारल्या. या कारच्या पाठीमागे अर्धा किलो मीटर अंतरावर शिवाजी व्यवहारे यांचे साडू दुसऱ्या वाहनात होते. ते अपघात स्थळी आल्यावर त्यांना सगळीकडे धुरळा झाल्याचे पहायला मिळाले.

अपघात झालेल्या कार जवळ जाऊन त्यांनी पाहिले तर शिवाजी व्यवहारे दिसत नव्हते. त्यांनी अंधारात बॅटरीने शोधाशोध सुरू केली. तेवढ्यात माजलगाव कडून एक ट्रॅव्हल्य गेवराईच्या दिशेने चालली होती. त्या ट्रॅव्हल्स चालकाला रस्त्याच्या कडेला पडलेले शिवाजी व्यवहारे दिसले नाहीत. ती ट्रॅव्हल्स शिवाजी व्यवहारेच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅव्हल्य कोणाची होती. हे समजू शकले नाही. याबाबत पोलिस तपास करत आहेत. या विचित्र अपघातामुळे माजलगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

Web Title: accident near gevrai in beed one dies