जालना : ट्रक-कारच्या अपघातात 4 जण ठार

accident in Jalna
accident in Jalna

जालना - जिल्ह्यातील भोकरदन-सिल्लोड रस्त्याजवळील मुठाड पाटीजवळ ट्रक व कार यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले, तर पाच जण जखमी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमधील नागरिक हे फुलंब्री (जि. औरंगाबाद) येथील रहिवाशी आहेत. शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात घडला. मैनाजी पिराजी बनसोडे (वय 65 वर्षे) त्यांचा मुलगा संजय मैनाजी बनसोडे वय 32 वर्षे, नातू श्रेयस संजय बनसोडे वय 5 वर्षे व भालचंद्र कचरू वाघ वय 36 वर्षे यांचा मृतांमध्ये समावेश असून अनीता संजय बनसोडे वय 27, ऋतुजा संजय बनसोडे वय 11 वर्षे , रामचंद्र उमाजी मोरे, जयश्री रामचंद्र मोरे, यश संजय बनसोडे हे गंभीर जख्मी झाले आहे. 

जखमींना उपचारसाठी औरंगाबाद घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मयतामधे एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश असून, हे सर्व जण चांडोळ जिल्हा बुलढाणा येथून लग्नकार्य उरकून घरी परतत असताना हा अपघात घडला अशी माहिती नातेवाईकांकडून मिळाली. या प्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com