‘समर युथ समिट’ ठरेल दिशादर्शक

याेगेश फरपट
मंगळवार, 6 जून 2017

‘यिन’ समर युथ समिटसाठी स्पेक्ट्रम , नीलया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, सीड इन्फोटेक, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, श्री. शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले पॅरामेडीकल महाविद्यालय, नॅशनल मिलिटरी स्कूल ॲन्ड ज्यू. कॉलेज, गायगाव यांचे विशेष सहकार्य लाभले.

अकाेला : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे, ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध असून जाे पिला ताे गुरगूरल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे ‘यिन’ समर युथ समिटच्या माध्यमातून युवकांना जे मार्गदर्शन मिळाले ते निश्चितच आयुष्यात यशस्वी व्यक्ती हाेण्यासाठी दिशादर्शक ठरेल असा आशावाद महात्मा फुले पॅराॅमेडीकल काॅलेजचे अध्यक्ष डॉ. सुधीर ढाेणे यांनी व्यक्त केला.

‘यिन’ ‘समर युथ समिट २०१७’चा समाराेप मंगळवारी सायंकाळी झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून ते बाेलत हाेते. यावेळी शासकीय अौद्याेगीक प्रशिक्षण संस्था (मुली) चे प्राचार्य प्रमाेद भंडारे, ज्येष्ठ रंगकर्मी रमेश थाेरात, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता कपील ढाेके, शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. विवेक हिवरे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

यावेळी ‘सकाळ’ वऱ्हाड आवृत्तीचे सहयाेगी संपादक संदीप भारंबे यांनी प्रास्ताविकातून तीन दिवस चाललेल्या या समर युथ समिटच्या कार्यक्रमावर प्रकाश टाकला. ‘सकाळ’ माध्यम समुहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचा उदय झाला आहे. महिलांसाठी तनिष्का तर युवकांसाठी यिन हे नेटवर्क काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर आपल्या मनाेगतातून शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. विवेक हिवरे यांनी ‘सकाळ’च्या उपक्रमांचे कौतूक केले.

शासकीय औद्याेगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रमाेद भंडारे यांनी महाविद्यालयातील बहुतांशी मुली ह्या यिनच्या सदस्या असून निश्चितच त्या समाजात चांगले काम करून संस्थेचे नाव माेठे करतील असा विश्वास व्यक्त केला. शेवटी यिन सदस्य आकाश आमटे व अंकिता मेंढे यांनी मनाेगतातून ‘समर युथ समिट’चा भविष्यात लाभ हाेईल असे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सांची गजघाटे तर आभार यिन समन्वयिका जया मुळे यांनी मानले.

‘यिन’सभासदांचा गौरव
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करणारे अमित लाेंढे, कांचन साखरकर, सांची गजघाटे, वैष्णवी निखाडे, निशा वाघमारे, राेहित हिवरकर, अक्षय राऊत, राहूल कुऱ्हे, आदित्य बावनखेडे, आशिष बडाेकार, भारत चांदवडकर, राज नंदागवळी, आकाश आमटे, निता घरडे, मनिषा पतराेडे या ‘यिन’च्या सभासदांसह यिन समन्वयिका जया मुळे, भागवत मापारी यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्लाेगन स्पर्धेतील विजेत्यांना पारिताेषीक देवून गौरविण्यात आले. यामध्ये प्रांजली मूळे, वैष्णवी बाेदडे, ऋषिकेश काळे यांचा समावेश हाेता.

विशेष सहकार्य
‘यिन’ समर युथ समिटसाठी स्पेक्ट्रम , नीलया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, सीड इन्फोटेक, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, श्री. शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले पॅरामेडीकल महाविद्यालय, नॅशनल मिलिटरी स्कूल ॲन्ड ज्यू. कॉलेज, गायगाव यांचे विशेष सहकार्य लाभले.