ज्येष्ठ पत्रकार विद्याभाऊ सदावर्ते यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

औरंगाबाद - ज्येष्ठ पत्रकार विद्याभाऊ सदावर्ते (वय 80) यांचे रविवारी (ता. 25) पहाटे दोनच्या सुमारास निधन झाले. सदावर्ते यांनी अजिंठा, लोकमत, देवगिरी तरुण भारत, गावकरी व सांजवार्ता या दैनिकांमध्ये विविध पदांवर काम केले. सदावर्ते यांचे इंग्रजी, हिंदी व उर्दू भाषेवरही प्रभुत्व होते. अनेक इंग्रजी पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केला आहे. जागतिक राजकारणाचा त्यांचा सखोल अभ्यास होता. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा दुधगावकर पुरस्कार, दर्पण पत्रकारिता, विश्वसंवाद संस्थेचा नारद पुरस्कार; तसेच अरविंद आ. वैद्य पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कारही त्यांना मिळाला होता.
Web Title: aurangaabad marathwada news vidyabhau sadavarte death