गुप्तांगावर शस्त्राने वार करून रिक्षाचालकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

औरंगाबाद - दुर्धर आजाराने ग्रस्त रिक्षाचालकाने स्वत:चे गुप्तांग कापून आत्महत्या केली. ही गंभीर घटना गुरुवारी (ता. एक) घाटी रुग्णालयात घडली. लक्ष्मण दामोजी गायकवाड (रा. राहुलनगर) असे मृताचे नाव आहे.

औरंगाबाद - दुर्धर आजाराने ग्रस्त रिक्षाचालकाने स्वत:चे गुप्तांग कापून आत्महत्या केली. ही गंभीर घटना गुरुवारी (ता. एक) घाटी रुग्णालयात घडली. लक्ष्मण दामोजी गायकवाड (रा. राहुलनगर) असे मृताचे नाव आहे.

गायकवाड हे गत एक वर्षांपासून दुर्धर आजाराने ग्रस्त होते. काही दिवसांपूर्वीच ते पंढरपुरात मेव्हण्याच्या घरी आले होते. अचानक ताप व श्‍वासोश्‍वासाला त्रास होत असल्याने त्यांचे भाऊ रावसाहेब गायकवाड यांनी त्यांना घाटीत दाखल केले. उपचारासाठी त्यांना वॉर्ड क्रमांक आठमध्ये ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान रात्री गायकवाड यांनी स्वत:च्या गुप्तांगावर धारदार शस्त्राने वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. रक्तस्त्राव व मोठी इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे जमादार एस. जी. बागडे यांनी दिली. या घटनेची नोंद एमआयडीसी वाळूज ठाण्यात झाली.

गायकवाड हे रेल्वे स्थानक परिसरातील राहुलनगर येथे राहत होते. आजार बळवल्याने उपचारासाठी त्यांना पैशांची मोठी गरज होती; परंतु पैशांची चणचण असल्याने काही दिवसांपूर्वींच गायकवाड कुटुंबीयांनी घर विकले. त्यानंतर गुरुवारी (ता. एक) पंढरपूर येथे राहणाऱ्या मेव्हण्यांकडे आले होते.

मराठवाडा

औरंगाबाद - औरंगाबाद शहरातील कुत्री पकडण्याचा विषय थेट दिल्लीपर्यंत गेला असून, केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी याप्रकरणी...

01.39 AM

समाजवादी पक्ष महापालिकेच्या ५० जागा लढविणार नांदेडः सद्या देशाची अवस्था वाईट असून, धर्माच्या नावाने सत्तेत आलेले भाजप गाय व...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

औरंगाबाद : उर्ध्व भागात सतत जोरदार पाऊस होत असल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीतील पाणीसाठा 88.10 टक्‍यावर...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017