झाड अंगावर कोसळून हरहुन्नरी क्रिकेटपटूचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - अंगावर बाभळीचे झाड कोसळल्याने अष्टपैलू हुरहुन्नरी क्रिकेटपटूचा मृत्यू झाला. जॉन्टी नावाने तो प्रसिद्ध होता. त्याच्या अचानक एक्‍झिटने बनेवाडी व क्रीडा वर्तुळात हळहळ व्यक्त झाली. ही घटना बनेवाडीजवळ रविवारी (ता. १७) मध्यरात्री घडली. 

विनोद राधेशाम करोडीवाल (वय ३०, रा. बनेवाडी) असे मृताचे नाव आहे. ते उत्कृष्ट क्रिकेटपटू होते. 

विनोद हे ‘स्पेक्‍ट्रा’ ऑईल कंपनीत विपणन व्यवस्थापक होते. रविवारी मध्यरात्री  काम आटोपून ते दुचाकीने घरी जात होते. त्या वेळी बनेवाडी गावाच्या अलीकडे त्यांच्या अंगावर बाभळीचे झाड कोसळले. यात गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. गावातील काही नागरिकांना बाभळीच्या झाडाजवळ प्रकाश दिसल्याने शंका आली. झाडाजवळ नागरिक आल्यानंतर त्यांना विनोद करोडीवाल दबलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी ही बाब वेदांतनगर पोलिस ठाण्यात सांगितली. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

जेसीबीद्वारे झाड बाजूला काढून विनोद यांना घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले; पण त्यांना डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. या घटनेची नोंद वेदांतनगर पोलिस ठाण्यात झाली. विनोद हे शहरातील प्रीमियम लीग स्पर्धा, तसेच मुंबई येथील स्पर्धेत खेळले होते. तसेच ते उत्तम ढोलवादकही होते. त्यांच्या अचानक एक्‍झिटमुळे नातेवाईक व बनेवाडीतील रहिवाशांनी हळहळ व्यक्त केली.