कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी आज आदिलाबाद-पंढरपूर विशेष रेल्वे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - दक्षिण मध्य रेल्वेतर्फे कार्तिकी एकादशीनिमित्त आदिलाबाद ते पंढरपूर आणि पंढरपूर ते नांदेड या दोन विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. सोमवारी (ता. 30) आदिलाबाद-पंढरपूर रेल्वे दुपारी दोन वाजता सोडण्यात येणार आहे. तर तीन नोव्हेंबरला नांदेड-पंढरपूर गाडी सायंकाळी 7.20 वाजता सोडण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे कळविण्यात आले आहे. दरम्यान, कार्तिकी एकादशीनिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणावर वारकरी पंढरपूरला जात असतात. यामुळे एक विशेष रेल्वे औरंगाबाद मधूनही सोडण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे. आषाढी एकादशीला औरंगाबादमधून विशेष रेल्वे सोडण्यात येते.