बीएसएनएलने उडविली दांडीबहाद्दरांसाठी दांडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

चेहरा दाखविल्याशिवाय हजेरीच नाही, बसविली फेस डिटेक्‍ट बायोमेट्रिक्‍स मशीन

औरंगाबाद - अनेक कर्मचारी सुटी न टाकता दांडी मारतात. कधी-कधी उशिरा येऊन वेळेत आल्याचे भासवतात. काही जण हजेरी बुकावर एकाच वेळी सह्या करतात. यावर उपाय म्हणून काही ठिकाणी कार्ड किंवा थम डिटेक्‍ट बायोमेट्रिक्‍स मशीन बसविण्यात आल्या. पण, त्यावरही काहींनी शक्कल शोधल्या. हेच लक्षात घेऊन कॅनॉट प्लेस येथील बीएसएनएलच्या प्रशासकीय विभागात अशा सर्व प्रकारच्या दांडीबहाद्दरांची दांडी उडविण्यासाठी फेस डिटेक्‍ट बायोमेट्रिक्‍स मशीन बसविण्यात आली आहे.

काळाबरोबर शासकीय कार्यालयेही आधुनिक होत आहेत. याचीच प्रचीती या कार्यालयाकडे पाहून येते. या कार्यालयाने बसवलेल्या मशीनसमोर कर्मचाऱ्यांना उभे राहावे लागते. त्यात त्यांचा पूर्ण चेहरा स्कॅन होतो. विशेष म्हणजे या मशीनद्वारे केवळ चेहराच नव्हे; तर बोटांचे ठस्से आणि ओळखपत्र या सर्व गोष्टी एकाच वेळी डिटेक्‍ट करता येतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या इन-आऊटच्या वेळेचा मागोवा घेण्यासही मदत होत आहे.  

असे चालते यंत्र
या यंत्राद्वारे डोळे व डोळ्यांतील रेटिना स्कॅन केले जाते. प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यांतील रेटिना नसा वेगवेगळ्या असतात. हे डोळे स्कॅन करून सहजपणे व्यक्तीला ओळखते. या मशीनचा वापर विविध गुप्तचर संस्था, एटीएम, जेल किंवा इतर महत्त्वाच्या ठिकाणी केला जातो. फिंगरप्रिंट स्कॅनर व इतर साधनांपेक्षा रेटिनल स्कॅनर अधिक प्रभावी असतो.

औरंगाबाद शहरात हा पहिलाच प्रयोग आहे. या माध्यमातून एकूण कामाची वेळ, लंच ब्रेक याचा तपशील जाणून घेण्यास मदत होणार आहे. येत्या दोन महिन्यांत शहरातील जुना मोंढा येथील बीएसएनएल, तारघर आणि मुकुंदवाडी येथील कार्यालयातही ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.
- एम. बी. कुलकर्णी, बीएसएनएल, जनसंपर्क अधिकारी, औरंगाबाद

Web Title: aurangabad marathwada news biometric punching in bsnl office