संघाच्या कार्यालयावर फेकला काळा रंग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

औरंगाबाद - भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांना महू येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. याचा बहुजन क्रांती मोर्चातर्फे तीव्र निषेध करत रविवारी (ता. नऊ) संघाचे कार्यालय असलेल्या प्रल्हाद भवनासमोर निदर्शने करण्यात आली. शिवाय संघाच्या फलकावर काळा रंग फेकण्यात आला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना शुक्रवारी (ता. सात) महू येथे विरोध दर्शवला. त्यामुळे संतप्त बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास भाग्यनगर येथील संघाच्या प्रल्हाद भवन कार्यालयावर धडक देऊन घोषणाबाजी केली. इमारत व फलकावर काळा रंग फेकत घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. निषेधाची पत्रकेही या वेळी भिरकावण्यात आली.