साखळी तोडली; पण पकडला गेला!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - महिलांचे मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार घडत असतानाच आता चोरट्यांनी पुरुषांच्या गळ्यातील सोन्याची साखळ्याही पळवण्याचे प्रकार सुरू केले आहेत; परंतु चोर साखळी पळवत असतानाच पाठलाग करून नागरिकांनी त्याला पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना  सोमवारी (ता. ११) सायंकाळी सातच्या सुमारास श्रेयनगरमधील एका रुग्णालयासमोर घडली. 

शेख अन्सार शेख गुलाब (रा. संजयनगर, ता. श्रीरामपूर) असे संशयिताचे नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली. शिरीष विठ्ठल देशपांडे (रा. बजरंग चौक) हे सोमवारी श्रेयनगर येथे गेले होते. त्यावेळी रस्त्यावर मागून आलेल्या शेख अन्सार याने देशपांडे यांच्या गळ्यातील ४५ हजारांची साखळी हिसकावली व तो पळू लागला. साखळी हिसकावताच देशपांडे यांनी लगेचच नागरिकांना बोलावून त्याचा पाठलाग सुरू केला. सर्वांकडून अन्सारला घेराव घालून पकडण्यात आले. त्याला चोप देऊन नागरिकांनी उस्मानपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले. तपास निरीक्षक सतीशकुमार टाक करीत आहेत.

Web Title: aurangabad marathwada news chain snacher arrested