‘सिद्धार्थ’ प्राणिसंग्रहालयाच्या ‘मास्टर प्लान’वर कारवाई करा

‘सिद्धार्थ’ प्राणिसंग्रहालयाच्या ‘मास्टर प्लान’वर कारवाई करा

औरंगाबाद - महापालिकेचे सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालय सेंट्रल झू अथॉरिटीच्या परवानगीविनाच सुरू असून, मास्टर प्लानकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे वन्य जिवांना मरण यातना सहन कराव्या लागत असल्याच्या ‘सकाळ’च्या वृत्ताची राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दखल घेतली आहे. याबाबत तातडीने कारवाई करून अहवाल कळवावा, असे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. 

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात वाघ, बिबटे, नीलगायी, हरीण यांच्यासह दीडशेहून अधिक प्राणी आहेत. या प्राण्यांना प्राणिसंग्रहालयात सध्या उपलब्ध असलेली जागा अपुरी असून, अनेकांना दाटीवाटीने ठेवण्यात आल्याचा आक्षेप अनेकवेळा सेंट्रल झू अथॉरिटीने घेतला आहे. 

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी सेंट्रल झू अथॉरिटीकडे प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव पाठविताना महापालिकेने ३० कोटींचा मास्टर प्लान तयार केला असून, त्यात पिंजऱ्याची दुरुस्ती, प्राणिसंग्रहालयाचा विस्तार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते; मात्र प्राणिसंग्रहालय मिटमिटा भागात सफारी पार्कवर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर मास्टर प्लानकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या यातना कायम असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने बुधवारी (ता. १३) प्रसिद्ध केले होते. याची दखल नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी घेतली आहे. मास्टर प्लानबाबत तातडीने कारवाई करून अहवाल सादर करावा, असे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com