आमदार इम्तियाज यांच्यासह सात नगरसेवकांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - महावितरणच्या परिमंडळ दोन कार्यालयात शुक्रवारी (ता. सहा) दुपारी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी इमारतीची तोडफोड करून कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या प्रकरणी आमदार इम्तियाज जलील, महापालिकेतील विरोधी पक्षनेते फेरोज पठाण यांच्यासह सात नगरसेवक व कार्यकर्त्यांविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

पवन कछोट यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, शहरात समानपद्धतीने लोडशेडिंग करण्याच्या मागणीसाठी एमआयएमचे आमदार एम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी मिलकॉर्नर येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयाजवळ कार्यकर्त्यांचा जमाव आला. या जमावाने अधिकारी, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व दमदाटी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. नगरसेवक नासेर सिद्दिकी यांनी सोबत आलेल्या कार्यकर्त्यांना चिथावणी दिली. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयातील एसी, नोटीस बोर्ड, बायोमेट्रिक मशीन, खिडकी व दरवाजाच्या काचा फोडून शासकीय मालमत्तेचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान केले. तसेच कार्यालयाच्या गेटवर नेमलेल्या महिला सेक्‍युरिटी गार्ड व पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण करून जखमी केले.

या प्रकरणी आमदार इम्तियाज जलील, फेरोज पठाण, नगरसेवक नासेर सिद्दिकी, सय्यद मतीन, रहीम नाईकवाडे, डॉ. गफार कादरी, अरुण बोर्डे, विकास एडके, रफत यार खान, डॉ. अफजन खान अजमल खान, जमीर कादरी, रफिक चित्ता, जफर बिल्डर, इर्शाद इब्राहिम खान, शेख सलीम, शेख इलियास यांच्याविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक बांगर तपास करीत आहेत.

Web Title: aurangabad marathwada news crime on seven corporator