'बसप'च्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

'बसप'च्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

औरंगाबाद - बहुजन समाज पक्षाचे (बसप) महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव डॉ. शरदचंद्र वानखेडे यांनी प्रदेश महासचिव आणि सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्षांच्या हुकूमशाहीला कंटाळून राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याविषयी वानखेडे म्हणाले, की मागील दहा वर्षांपासून मी पक्षात एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. या काळात राज्याचा प्रदेश सचिव म्हणूनही मराठवाडा झोनमध्ये काम केले. जालना लोकसभा मतदारसंघातून बसपतर्फे निवडणूक लढवून तिसऱ्या क्रमांकाची मते मिळविली; मात्र प्रदेशाध्यक्षांच्या हुकूमशाहीला तसेच आर्थिक शोषणाच्या प्रवृत्तीचा निषेध करून पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com