वीजचोरी, गळतीने महावितरण हैराण

वीजचोरी, गळतीने महावितरण हैराण

वीजवापर अन्‌ वसुलीचा हिशेब जुळता जुळेना 

औरंगाबाद - महावितरणला वीज गळतीने त्रस्त केले आहे. गेल्या तीन महिन्यांत वीज गळती आणि वीजचोरीने ७९ कोटी ४३ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. हा तोटा कमी करण्यासाठी महावितरणने ठोस पावले उचलली असल्याची माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळात औरंगाबाद व जालना जिल्ह्याचा सामावेश आहे. या दोन्ही जिल्ह्यांत वीजचोरीचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल ते जूनदरम्यान दोन्ही जिल्ह्यांतील ग्राहकांनी ४७५.८१ दशलक्ष युनिटचा वापर केला. मात्र, त्या बदल्यात केवळ ३१६.९४ दशलक्ष युनिटचे वीजबिल महावितरणला मिळाले आहे. म्हणजे १५८.८७ दशलक्ष युनिटची वीज गळती व चोरी झाली आहे. यामुळे ७.४३ लाख रुपयांचा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. दोन्ही शहरांत ३० ते ४० टक्के वीज गळतीचे प्रमाण आहे.

आकडे टाकून वीज वापरणे, मीटरमध्ये फेरफार करणे, रिमोट कंट्रोलचा वापर करणे अशा प्रकारांनी महावितरण त्रस्त झाली आहे. मीटर रिमोट कंट्रोलद्वारे हाताळणे, मीटरमध्ये फेरफार करणे, मीटर बायपास करणे हे काम करून देण्यासाठी काही टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या विरोधात थेट मोहीम सुरू केल्याने गेल्या तीन महिन्यांत दोन हजार ८४३ चोऱ्या पकडण्यात आल्या असून, २७२ वीजचोरांच्या विरोधात थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

थकबाकीचेही आव्हान
घरगुती व व्यापारी, औद्योगिक वीज ग्राहकांकडे थकबाकी वाढली आहे. मार्चपर्यंत असलेल्या १८२.४५ कोटी रुपयांच्या थकबाकीत जूनअखेर २३४.३४ कोटी रुपयांची थकबाकी वाढली. म्हणजे तीन महिन्यांत ५१.८९ कोटी रुपयांची निव्वळ थकबाकी वाढली आहे. अधिकाधिक वसुली करण्याच्या उद्देशाने बिल दुरुस्तीसाठी प्रत्येक सोमवारी मेळावे घेण्यात येत आहेत. गेल्या दोन मेळाव्यांत ९२९ बिल दुरुस्तीच्या तक्रारी महावितरणकडे आल्या होत्या. त्यापैकी ६०५ तक्रारींचे निरसन करण्यात आले असून, उर्वरित ३२४ तक्रारींचे निवारण करण्यात येत असल्याचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले. 

तीन महिन्यांत ७९ कोटी रुपयांचा तोटा 
युद्धपातळीवर चोरी रोखण्याची मोहीम
वसुलीसाठी यंत्रणा लागली कामाला

शहरात १८ कोटींचा तोटा 
औरंगाबाद शहरातही वीजचोरीचे प्रमाण वाढले आहे. विभाग क्रमांक एकमध्ये २२.९२ मिलियन युनिटची चोरी होत असल्याने ११ कोटी ४६ लाख रुपयांचा फटका बसला आहे. विभाग क्रमांक दोनमध्ये १४.८७ मिलियन युनिट म्हणजे सात कोटी ४४ लाख रुपयांची वीजचोरी होत असल्याने महावितरणसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com