मुलाने केले वडिलांचे देहदान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - मृत्युपश्‍चात एका मानवी देहामुळे तब्बल ३५ व्यक्तींना नवे आयुष्य मिळू शकते. एवढेच नाही, तर या देहाचा अभ्यास करून चांगले डॉक्‍टरही घडू शकतात. याच उद्दात हेतूने सिडको टाऊन सेंटर परिसरातील एस. बी. राऊत यांनी आपल्या वडिलांचे शुक्रवारी (ता. तीन) मरणोत्तर देहदान घडवून आणले. एवढेच नाही, तर पत्नी एम. एस. राऊत यांच्यासह स्वतःसुद्धा देहदानाचे संकल्पपत्र भरून दिले.

एलआयसीतील निवृत्त अधिकारी बापूराव सखाराम राऊत (वय ९७) हे श्री. राऊत यांचे वडील. बापूराव यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मुलाने आणि सुनेने आपले दुःख बाजूला सारून त्यांचे घाटी रुग्णालयात मरणोत्तर देहदान घडवून आणले. त्यांच्या देहाचा शिकाऊ डॉक्‍टरांना अभ्यासासाठी फायदा होणार आहे.

अडीच महिन्यांतले चौथे देहदान
पंधरा सप्टेंबरपासून घाटी रुग्णालयात चौघांचे देहदान करण्यात आले आहे. १५ सप्टेंबरला पीरबाजार, दार्ग रोड येथील सुलभा वसंत दीक्षित (८४), १६ सप्टेंबरला रत्नपूर तालुक्‍यातील सराई येथील कारभारी सखाराम नागे (७०), साऊथ सिटी सिडको एमआयडीसी येथील विनोद शिवप्रसाद निगम (८५) यांचे देहदान करण्यात आले. मागील अडीच महिन्यांत राऊत यांचे चौथे देहदान आहे, अशी माहिती घाटीचे शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख व उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.

टॅग्स