शासनाची कर्जमाफी ही धूळफेक असल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

औरंगाबाद - राज्य शासनाचा शेतकरी कर्जमाफीचा अध्यादेश ही धूळफेक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले गेल्याचा आरोप सुकाणू समितीचे सदस्य नामदेव गावडे यांनी शुक्रवारी (ता. 7) येथे पत्रकार परिषदेत केला.

गावडे म्हणाले, 'सरकारचा खोटारडेपणा उघडा पाडण्यासाठी सुकाणू समितीतर्फे 10 जुलैपासून राज्यभर जनजागरण यात्रा तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर 24 ते 26 जुलैदरम्यान देशभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात जंतर मंतरवर "घेरा डालो, डेरा डालो' हे देशव्यापी आंदोलनही केले जाणार आहे.
दरम्यान, कर्जमाफीचा अध्यादेश आणि समृद्धी महामार्गासाठी निश्‍चित केलेल्या दरपत्रकाची होळी करण्यात आली. या वेळी भाकपचे राज्य सरचिटणीस भालचंद्र कानगो उपस्थित होते.