CCTV मुळं पकडली औरंगाबादमध्ये पेट्रोल चोरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

पोलिसांचे वाहन पोचत नाही, अशा गल्लीबोळात वाहनातून पेट्रोल चोरी सुरु होती. या चोरीचे फुटेज प्राप्त झाले होते, त्यानुसार आम्ही संशयितांचा शोध घेतला. सहा महिन्यांपासून पेट्रोल चोरी सुरु होती, अशी संशयितांनी कबुली दिली. 
- अशोक मुदीराज, पोलिस निरीक्षक.

औरंगाबाद - रात्री-अपरात्री कॉलनी, वसाहतीत उभ्या वाहनांतून पेट्रोल चोरी करुन स्वत:साठी वापर करुन विक्री करणाऱ्या तरुणाला पुंडलिकनगर पोलिसांनी शुक्रवारी (ता. सहा) अटक केली. एका अल्पवयीनाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक बुलेट, चार लिटर पेट्रोल व नळी असा दीड लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. 

  • एक अटकेत, अल्पवयीन ताब्यात 
  • बुलटेसह पेट्रोल, नळी जप्त 
  • पुंडलिकनगरमध्ये झाली पेट्रोलचोरी
  • पेट्रोल चोरताना सीसीटीव्हीत कैद

पोलिस निरीक्षक अशोक मुदीराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषीकेष संतोष पालोदकर (वय-18, रा. पुंडलिकनगर) असे संशयित तरुणाचे नाव आहे. गत काही दिवसांपासुन पुंडलिकनगर, हनुमाननगर, गणेशनगर, गारखेडा गाव भागात पेट्रोल चोरी सुरु होती.

नागरिकांनी रात्रीच्यावेळी घराबाहेर ठेवलेल्या दुचाकी व अन्य वाहनांतील पेट्रोल संशयित तरुण काढीत होते. 21 ते 29 सप्टेबरदरम्यान 28 लिटर पेट्रोल चोरी झाल्याची तक्रार नागरिकांकडून देण्यात आली. तक्रारीची दखल घेवून पुंडलिकनगर पोलिसांनी संशयितांचा सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध सुरु केला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले, त्यावेळी त्यांनी पेट्रोल चोरीची कबुली दिली. तसेच पेट्रोल स्वत:च्या दुचाकीसाठी शहरात व कर्णपुरा यात्रेत जाण्यासाठी ते वापरत होते, तर उर्वरित पेट्रोलची विक्री केली जात होती. अशी माहिती पोलिसांनी दिली. दोघेही शिक्षण घेत असून त्यांच्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.

सीसीटीव्हीत चोरी कैद 
पुंडलिकनगर भागात पेट्रोल चोरी होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना व्हॉटस्अॅपवर प्राप्त झाल्या. तसेच सीसीटीव्ही फुटेजही नागरिकांनी पोलिसांना प्राप्त करुन दिले. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरुन तरुणांना पकडले. त्यांची चौकशी सुरु असून यापुर्वी कुठे पेट्रोल चोरी केली याची माहितीही घेतली जात आहे. 

Web Title: aurangabad marathwada news petrol theft