वीस मिनिटांत दाणादाण!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - सलग तीन दिवस उकाड्याने औरंगाबादकरांचा घाम काढल्यानंतर सोमवारी (ता. ११) सायंकाळी पावसाने अवघ्या २० मिनिटांत दाणादाण उडवली. जालना रस्त्यावर जागोजागी साठलेल्या पाण्यामुळे अनेकांना आपल्या वाहनांची ढकलपट्टी करावी लागली. 

सलग तीन दिवस उकाड्याने हैराण करुन सोडले होते. तापमानाने ३२ अंशांचा आकडा गाठला. सोमवारीही दिवसा उन्हाने हैराण करुन सोडलेले असताना रात्री साडेदहाच्या सुमारास वरुणराजा बरसला. अवघ्या २० मिनिटांत रस्ते पाण्याखाली गेले. जालना रोड आणि त्यालगत असलेल्या जलमय रस्त्यांवर अनेक गाड्या बंद पडल्याने वाहनधारकांची चांगलीच धावपळ झाली. दरम्यान, चिकलठाणा वेधशाळेत या पावसाची ९ मिमी इतकी नोंद झाली.

अनेक भागांत वीज गुल 
शहरात आजपासूनच भारनियमनास सुरवात झाली आहे. रात्री झालेल्या पावसाने अनेक भागांत अंधार होता. पाऊस सुसाट असला तरी फारवेळ पडला नसल्याने पाणी साचल्याच्या तक्रारी नसल्याचे अग्निशामक दलातर्फे सांगण्यात आले.

दमदार पावसाची चिन्हे
आगामी दोन दिवस दुपारनंतर पावसाची चिन्हे आहेत. यादरम्यान झड लागण्याची आणि विजा कडाडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. उन्हाच्या तीव्रतेतही घट होणार असून शहरवासीयांना उकाड्यापासून काही काळ विश्रांती मिळू शकते.

Web Title: aurangabad marathwada news rain