औरंगाबाद शहर परिसरात जोरदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - मागील आठवडाभरापासून तापमान वाढले होते. त्यामुळे उकाड्याने नागरिक त्रस्त झाले. दरम्यान, दोन दिवसांपासून शहरावर ढगांनी गर्दी केली असून, रविवारी (ता. आठ) दुपारी तासभर जोरदार पावसाने हजेरी लावली. परिणामी, ऑक्‍टोबर हीटपासून दिलासा मिळाला. दरम्यान, येत्या पाच दिवसांपर्यंत शहरावर ढगांचा मुक्काम कायम राहणार असून, या काळात पाऊसही होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला.  

ऑक्‍टोबर महिना सुरू होताच या महिन्यात भासणाऱ्या गरमीने आपले अस्तित्व चांगलेच जाणवून दिले होते. पहिल्या आठवड्यात गरमीचे चटके लागल्यानंतर शनिवारी (ता. सात) ढगांचा डेरा शहरावर राहिला. या दिवशी विजांच्या गडगडाटात पाऊस झाला आणि दुपारीच त्याला पूर्णविराम मिळाला होता. दरम्यान, रविवारी सकाळपासूनच शहरावर ढगांचा डेरा कायम होता. दुपारी सुमारे तासभर पाऊस झाला.

असे राहील वातावरण
आगामी पाच दिवस ढगाळ वातावरण कायम राहणार असून, बुधवारपर्यंत (ता. ११) हलक्‍या सरी तर गुरुवारी (ता.१२) मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आली. तीन ते चार अंशांपर्यंत कमाल तर एक ते दोन अंशांपर्यंत किमान तापमान घटण्याची शक्‍यताही वर्तविण्यात आली आहे.