मुंबईतील पावसाने विमानसेवेवर परिणाम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा विमानसेवेवर परिणाम झाला आहे. औरंगाबादहून मुंबईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या अशा दोन्ही बाजूंच्या चारही विमानांवर विपरित परिणाम झाला. जेट एअरवेजचे बुधवारी (ता. २०) सकाळचे विमान रद्द करावे लागले, तर जेटलाईट आणि एअर इंडिया या दोन्ही विमानांना तीन तास उशीर झाला. दिल्लीहून येणाऱ्या एअर इंडियच्या विमानालाही पाऊण तास उशीर झाला. 

मुंबईत मंगळवारी (ता. १९) दुपारपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने त्याचा फटका विमानसेवेला बसला. धावपट्टीवर पाणी असल्याने मुख्य धावपट्टी बंद होती. पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा आणि खराब हवामान असल्याने विमासेवा कोलमडून पडली. बुधवारी सकाळी ६.२५ वाजता मुंबईला जाणारे जेट एअरवेजचे (क्र. ९ डब्ल्यू ३१३) विमान रद्द करावे लागले. त्यानंतर संध्याकाळी ५.१५ वाजता मुंबईहून येणारे जेट एअरवेजचे विमान (क्र. ९ डब्ल्यू ७१४८) तब्बल तीन तास उशिराने म्हणजे रात्री ८.१५ औरंगाबादला पोचले. तर एअर इंडियाचे सायंकाळी ५.०५ वाजता येणारे मुंबई-औरंगाबाद विमान (क्र. ए-१-४४२) हे रात्री नऊला आले. तर एअर इंडियाचे विमान (ए-१- क्र. ४४१) हे दिल्लीहून औरंगाबादला ७.३५ वाजता येणारे विमान पाऊण तास उशिराने शहरात आले, त्यानंतर ८.१० मिनिटाने मुंबईकडे झेपावले. मुंबईच्या पावसाने विमानाचे वेळापत्रक कोलमडून पडल्याने प्रवाशांना प्रवास रद्द करावा लागला. अनेकांनी अन्य पर्यायी मार्गाने जाणे पसंत केले.

Web Title: aurangabad marathwada news rain effect on aeroplane service