प्रोझोन मॉलमधील स्पाच्या मालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

प्रोझोन मॉलमधील स्पाच्या मालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

औरंगाबाद - प्रोझोन मॉलमधील स्पा सेंटरच्या नावाखाली हायप्रोफाइल कुंटणखाना चालवणाऱ्या मुंबईच्या तीन मालकांचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी नामंजूर केला.

प्रोझोन मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली पोलिसांच्या विशेष पथकाने सात डिसेंबरला छापा मारून देहविक्री करणाऱ्या देशी-विदेशी तरुणींसह एकूण १८ जणांना अटक केली होती. त्यात नऊ विदेशी महिलांसह अकरा आणि चार ग्राहक काम करणारे अन्य तीन जणांना अटक केली. त्यातील नऊ विदेशी मुलींची सावित्रीबाई सुधारगृहात रवानगी करण्यात आली. उर्वरित नऊ जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्यातील स्पा मसाज सेंटरचा मालक डेरेक इलिस मायडो (वय ३०, रा. मालवण), फैजन रईस शेख (रा. कुर्ला) आणि विशाल कृष्णा शेट्टी यांनी या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जमीन अर्ज दाखल केला होता.

या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी (ता. १५) सुनावणी झाली. तपास अधिकारी शिवाजी कांबळे व मुख्य सरकारी वकील अविनाश कांबळे यांनी युक्तिवाद केला. देशात स्पा, मसाज सेंटरच्या नावाखाली आंतरराष्ट्रीय स्तरावर चालविल्या जाणाऱ्या देह व्यापारामध्ये या तिघांचा सहभाग आहे.

त्यांचे देशातील हैदराबाद, बंगळोर येथे स्पा सेंटर सुरू आहेत. त्यांनी विदेशातून किती मुली आणल्या होत्या, याचा तपास करावयाचा असून, विदेशी मुलीकडे बनावट पासपोर्ट आढळून आल्याने त्यासंदर्भातही चौकशी करावयाची आहे. एक विदेशी तरुणीकडे अद्यापही पासपोर्ट मिळाला नाही, ती कशी काय देशात आली, याचा शोध घ्यावयाचा आहे. विदेशातून अन्य व्यक्तींना आणून यांनी काही देशविघातक कृत्य केले आहे का, याचीही चौकशी करावी लागणार आहे. त्यामुळे त्या तिघांनाही अटक केल्याशिवाय या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती न्यायालयात करण्यात आली.थायलंडच्या तरुणींना शुक्रवारी (ता. १५) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांच्यासमोर हजर करण्यात आले. सुनावणीनंतर त्यांना पुन्हा सावित्रीबाई फुले सुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com