लघू-मध्यम उद्योगांचे तीनदिवसीय प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - येथील लघु व मध्यम उद्योगांना देशभरातील उद्योग व तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या हेतूने जैन इंजिनियरिंग सोसायटी, इंदोर - इन्फोली व मराठवाडा ऑटो क्‍लस्टर यांच्यातर्फे ‘इंडिएक्‍स्पो औरंगाबाद २०१७’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. 

शुक्रवारी (ता. १०) अयोध्यानगरीच्या मैदानावर सुरू होत असलेल्या प्रदर्शनाचा रविवारी (ता. १२) समारोप होईल. प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. ‘जैन’चे एक्‍स्पो संचालक रूपेश ठोले यांनी सांगितले, की देश-विदेशांतील हजारो उत्पादनांचा सहभाग या प्रदर्शनात असणार आहे. आंतराष्ट्रीय कंपन्याही यात सहभागी होत आहेत. औरंगाबादमध्ये औद्योगिक प्रगतीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल असे वातावरण असून या एक्‍स्पोच्या माध्यमातून त्याला विकासाची जोड मिळेल व प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. आनंद मिश्रीकोटकर यांनी उद्योजकांना नवीन उत्पादनांविषयींची माहिती, तसेच उत्तम बाजारपेठेची उपलब्धता याचा प्रदर्शनातून लाभ होईल, असे मत व्यक्त केले. या वेळी राजेश पाटणी, शिरीष खंदारे, भरत ठोले, कमल पहाडे, चेतन ठोले, नितीन बोहोरा, रजनीश कटारिया, सुनील सेठी, मुकेश ठोले यांची उपस्थिती होती.