वेदांमुळे अत्याचार थांबतील - सत्यपालसिंह

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

औरंगाबाद - 'शाळा, महाविद्यालय, महिलांना वेदांचे शिक्षण दिले पाहिजे. वेद शिकल्यानंतर समाजातील अन्याय, अत्याचार थांबतील,'' असे वक्‍तव्य केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपालसिंह यांनी केले. अखिल भारतीय वैदिक संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी डॉ. सिंह बोलत होते. "देशातील सर्व समस्या सोडविण्यासाठी वेदशास्त्रानुसार चालणे महत्त्वाचे आहे. चारही वेदांत कुठेही हिंदू शब्द लिहिलेला नाही, त्यामुळे वेद मानवतेसाठीच आहेत.

वेदांत सृष्टीचे विज्ञान आहे. वेदांमधील सत्यासाठी कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. वेदांची प्रतिष्ठा होणार नाही, तोपर्यंत देशाच्या संस्कृतीची प्रतिष्ठा वाढणार नाही,' असे ते म्हणाले. माणूस आधी माकड होता आणि मग तो माणूस झाला याचा वेद किंवा इतिहासात कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे डार्विनचा सिद्धांत चुकीचा आहे, असा दावाही त्यांनी केला.

Web Title: aurangabad marathwada news Vedas will end oppression