विद्यार्थ्यांनी तयार केले वायरलेस फिंगरप्रिंट अटेंडन्स सिस्टीम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

गैरहजर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना जाणार संदेश

औरंगाबाद - छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्‍ट्रॉनिक्‍स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी वायरलेस फिंगरप्रिंट अटेंडन्स सिस्टीम तयार केली आहे. दैनंदिन हजेरी घेण्यासाठी शाळा, महाविद्यालयातील कागदोपत्री वापर कमी व्हावा, तसेच हजेरीतील गैरप्रकारांना आळा बसावा हा सिस्टीम बनविण्यामागचा हेतू आहे.

अंतिम वर्षात शिक्षण घेणारे आदिती जवळकर, नेहा शेवाळे, पल्लवी मुळे या विद्यार्थ्यांनी ही सिस्टीम बनविण्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारली. त्यांना प्रा. अक्षय देशमुख, प्रा. अक्षय जाधव यांनी सहकार्य केले. या सिस्टीममध्ये बायोमेट्रिक फिंगरप्रिंटस सेन्सरचा वापर केला आहे. यामुळे हाताच्या कोणत्याही बोटाचा ठसा सेन्सरवर उमटून विद्यार्थ्याला हजेरी लावता येणार असल्याचे महाविद्यालयातर्फे सांगण्यात आले. सिस्टीममध्ये सर्व विद्यार्थ्यांनंतर शिक्षकही हजेरी लावतील; मात्र शिक्षकांनंतर कोणीही हजेरी लावू शकणार नाही. तसेच गैरहजर विद्यार्थ्यांच्या पालकांना संदेश जाण्यास सुरवात होईल हे या सिस्टीमचे वैशिष्ट्य आहे. 

विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. यु. बी. शिंदे, इलेक्‍ट्रॉनिक्‍स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख प्रा. देवेंद्र  भुयार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.