तीन आठवड्यांनी शहरात परतला पाऊस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

दुपारनंतर लावली हजेरी, २४ तासांत ०.३ मिलिमीटरची नोंद

औरंगाबाद - गायब झालेला पावसाने अखेर तीन आठवड्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर मंगळवारी (ता. १८) शहरात हजेरी लावली. सकाळपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या शहराला दुपारनंतर थोड्याफार प्रमाणात का होईना दिलासा दिला. सायंकाळी साडेआठपर्यंत ०.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. रात्री नऊ नंतरही अधुनमधुन हलक्‍या स्वरुपाच्या पाऊसाच्या सरी कोसळल्या.

औरंगाबाद शहरातून सुमारे तीन आठवडे गायब असलेल्या पावसाने मंगळवारी (ता.१८) आपली उपस्थिती नोंदवली. या महिन्यात अठरा पैकी केवळ चारच दिवस पाऊस पडला असून, उर्वरित काळ हा कोरडाच गेला आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या महिन्यात ११ दिवस पाऊस पडला होता आणि त्यात मोठ्या पावसाचाही समावेश असल्याने जूनमध्ये १५० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. औरंगाबादेत सरासरीच्या तुलनेत केवळ ८३.४ टक्के पाऊस झाला आहे.