कमी उत्पन्नाच्‍या लांब पल्ल्याच्या सात एसटी बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

औरंगाबाद - औरंगाबाद विभागातून लांब पल्ल्याच्या मार्गावर चालविण्यात येत असलेल्या बसगाड्यांतून मोठा तोटा होत असल्याचे सांगतिले जात आहे. हा तोटा कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात या मार्गावरील सात बसगाड्या बंद करण्याचा निर्णय विभागीय पातळीवर घेण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या सात बसगाड्या बंद करण्यात आल्या आहेत, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संदीप रायलवार यांनी ‘सकाळ’ला दिली. 

खासगी वाहतुकीशी स्पर्धा करीत सार्वजनिक सेवा देणाऱ्या एसटीचे प्रवासी दिवसेंदिवस कमी होत आहेत. यामुळे उत्पन्नावरही मोठा परिणाम झाला आहे. एवढेच नाही तर हा तोटा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हा तोटा कमी करण्यासाठी एसटीतर्फे उपाययोजना सुरू आहेत. सिल्लोड, मध्यवर्ती, पैठण, वैजापूरसह अन्य आगारांतून उत्पन्न कमी व तोट्यातील सात गाड्या तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या आहेत. स्पर्धेच्या काळात टिकाव लागावा म्हणून उत्पन्न वाढीबरोबर चांगली सेवा देण्याचा आमचा उद्देश आहे. यामुळेच तात्पुरत्या स्वरूपात या बसगाड्या बंद करण्यात आल्या आहेत. या बस चांगले उत्पन्न मिळणाऱ्या मार्गावर सोडण्यात येतील, असे श्री. रायलवार यांनी सांगितले.

या बस झाल्या बंद 
औरंगाबाद-तुळजापूर 
औरंगाबाद- उमरगा
सिल्लोड-पुणे, 
सिल्लोड -जळगाव
पैठण- सोलापूर
वैजापूर-शिर्डी
लासूर-पुणे