महापालिकेची वंदे मातरम्‌वरून तहकूब झालेली सभा मंगळवारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - वंदे मातरम्‌वरून अभूतपूर्व गोंधळ झाल्याने गेल्या आठवड्यात तहकूब करण्यात आलेली महापालिकेची सर्वसाधारण सभा आता मंगळवारी (ता. २९) आयोजित करण्यात आली आहे. या वेळी शंभर कोटींच्या रस्त्यांची यादी गाजण्याची शक्‍यता आहे.   

महापालिकेच्या १९ ऑगस्टला झालेल्या सभेत वंदे मातरम्‌वरून अभूतपूर्व गोंधळ झाला होता. एमआयएम पक्षाचे सय्यद मतीन व काँग्रेसचे सोहेल शेख वंदे मातरम्‌ सुरू असातना सभागृहात बसून राहिले. त्यानंतर नगरसेवकांचे एका दिवसासाठी महापौरांनी सदस्यत्व निलंबित केले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. शिवसेना-भाजप व एमआयएम पक्षाचे नगरसेवक समोरा-समोर आले. या गोंधळात महापौरांनी सभा तहकूब केली होती. आता पुन्हा ही सभा मंगळवारी बोलाविण्यात आली आहे. त्यामुळे या तहकूब सभेत निलंबित अधिकारी, तसेच शंभर कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या यादीचा विषय गाजण्याची शक्‍यता आहे. शासनाने नुकतीच शंभर कोटींच्या रस्त्यांच्या यादीला मंजुरी दिली आहे. त्यात अनेक चांगले रस्ते घेण्यात आल्याने स्थायी समितीसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे मंगळवारच्या सभेत रस्त्यांची यादी गाजण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.