औरंगाबादेत तीन वाहनांची तोडफोड; सीसीटीव्हीत प्रकार कैद

attack
attack

औरंगाबाद - औरंगाबादेत भडकलगेट परिसरात तीन वाहनांची 15 ऑक्टोबरला रात्री अकरादरम्यान तोडफोड झाली. हा प्रकार सिसिटीव्हीच्या माध्यमातून मंगळवारी (ता. 18) उघड झाला. अज्ञात माथेफिरू वाहने फोडताना सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. 
टाऊन हॉल परिसरात

काही दिवसांपूर्वी दुचाकी जाळल्याच्या प्रकार घडला होता. त्यानंतर पुन्हा काही मीटर अंतरावरच  15 ऑक्टोबरला भडकल गेटवर अथर सय्यद यांच्या वाहनांची तोडफोड झाली. सय्यद यांचा वाहनांचा व्यवसाय असून त्यानी याबाबत तक्रार दिली होती. यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद सिटीचौक ठाण्यात झाली. त्यानंतर या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी व काही नागरिकांनी तपासले. यात अज्ञात व्यक्ती वाहने फोडत असल्याचे स्पष्ट दिसले.  त्याचा पोलिस शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com