एकीकडे पाडपाड, दुसरीकडे संवर्धन समिती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

औरंगाबाद - पाठीमागच्या नाल्यावरील पुलावर रस्त्याच्या कामासाठी मंगळवारी (ता. ११) दमडी महलला पुन्हा नख लावण्यात आले. या ऐतिहासिक महालाच्या उरल्यासुरल्या अवशेषांवर महापालिकेचा जेसीबी पंजा फिरवीत असतानाच विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘औरंगाबाद वारसा संवर्धन समिती’ स्थापनेचे परिपत्रक प्रसिद्ध झाले. 

विकासकामे करताना आड आलेल्या ऐतिहासिक अवशेषांचा सरसकट बळी देण्याची घातक प्रथा शहरात रुजली आहे. खुद्द महापालिका प्रशासनाकडूनच या गोष्टी होत असल्याने ‘हाक ना बोंब’ असाच प्रकार सुरू आहे. तीन-चारशे वर्षांपूर्वीची बांधकामे धडाधड पाडली जात आहेत. चंपा चौक ते पंचायत समिती रस्त्यासाठी दमडी महालाचा पुढील भाग नुकताच पाडण्यात आला होता. हेरिटेज कमिटीच्या मंजुरीनेच सुरू असलेल्या या प्रकाराला इतिहासप्रेमींनी कडाडून विरोध केला. मात्र, मंगळवारी दुपारी आयुक्त आणि महापौर चिनी पाहुणचार घेत असताना इकडे पुन्हा महालाचा मोठा भाग पाडण्यात आला. दमडी महालाचा अडसर दूर केल्यानंतर चंपा चौकाकडून जिल्हाधिकारी कार्यालय व गणेश कॉलनीकडे जाणाऱ्यांचा एस. टी. कॉलनी, फाजलपुरा मार्गाने पडणारा वळसा वाचणार आहे.

दमडी महालाचा उरलेला हिस्सा जतन आणि संवर्धन करू, असे आश्‍वासन आम्हाला देण्यात आले होते. ते फसवे होते, असे समजायचे का? दमडी महालाचा बळी घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. 
- डॉ. दुलारी कुरेशी, सदस्य, हेरिटेज कमिटी

मराठवाडा

औरंगाबाद : उर्ध्व भागात सतत जोरदार पाऊस होत असल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीतील पाणीसाठा 88.10 टक्‍यावर...

02.21 PM

माजलगाव (जि. बीड) : शहरालगतच असलेल्या अकरा पुनर्वसित गावामध्ये ऐन सणासुदीच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा  ...

12.09 PM

औरंगाबाद - नेत्यांची मनमानी आणि तालुकास्तरावर पोचलेल्या गटबाजीचा फटका काँग्रेसला ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर बसण्याची शक्...

10.03 AM