‘ऑरिक’ला वीस महिन्यांत करणार नेक्‍स्ट जनरेशन सिटी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - ऑरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीला २० महिन्यांत स्मार्ट करण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड (हेल) ही कंपनी हे काम करणार असून, पुढील पाच वर्षे या यंत्रणेची देखरेख करण्याचे कामही याच कंपनीकडे राहणार आहे. ‘ऑरिक’ला ‘नेक्‍स्ट जनरेशन स्मार्ट सिटी’चा लूक यातून मिळणार असून, यासाठीचे सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. 

औरंगाबाद - ऑरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीला २० महिन्यांत स्मार्ट करण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड (हेल) ही कंपनी हे काम करणार असून, पुढील पाच वर्षे या यंत्रणेची देखरेख करण्याचे कामही याच कंपनीकडे राहणार आहे. ‘ऑरिक’ला ‘नेक्‍स्ट जनरेशन स्मार्ट सिटी’चा लूक यातून मिळणार असून, यासाठीचे सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. 

ऑरिक इंडस्ट्रिअल सिटीला डिजिटायझेशनच्या दिशेने नेण्यासाठी आयसीटी इन्फॉर्मेशन ॲण्ड टेक्‍नॉलॉजीची (आयसीटी) भविष्यात मोठी भूमिका राहणार आहे. ‘ऑरिक’मधील हालचालींवर लक्ष ठेवणारी ही यंत्रणा या शहराची ‘नर्व्हस सिस्टीम’ असेल आणि शहराच्या विविध भागांत सुविधांचा किती वापर होतो आहे, याची 

इत्थंभूत नोंद आयसीटी करणार आहे. शहरभर उभारण्यात येणाऱ्या सीसीटीव्हींच्या जाळ्यामुळे ऑरिक स्मार्टच नाही; तर सेफही होणार आहे. या यंत्रणेचे नियंत्रण ऑरिक हॉलमधील ऑरिक कंट्रोल सेंटरसह अन्य ठिकाणी असणारे केंद्र करणार आहेत. या यंत्रणेचे प्रत्यक्षात काम सुरू झाले असून, या यंत्रणेसाठी लागणारे सॉफ्टवेअर, सिटीझन ॲपची निर्मिती सध्या सुरू आहे. ही यंत्रणा ऑरिकच्या विकासात मोठी भर घालणार आहे. फायबर ऑप्टिक नेटवर्कचे जाळे, व्हॉईस व्हिडिओ आणि डेटासारख्या सुविधा सुसह्य होणार आहेत. यासाठी सुरवातीला शंभर कोटींपेक्षा अधिक खर्च केला जाणार आहे. 

सिग्नलचे टायमिंग ठरणार वाहतुकीवर
शेंद्रा येथील ऑरिकमध्ये वाहनांच्या सुटसुटीत प्रवासासाठी लावण्यात येणाऱ्या सिग्नलवर आयसीटीचे नियंत्रण राहणार आहे. वाहतुकीच्या ओघावर सिग्नलचे टायमिंग निर्भर राहणार आहे. ज्या बाजूने वाहतुकीचा ओघ अधिक त्या बाजूच्या सिग्नलला वाहनांची कोंडी टाळण्यासाठी अधिक अवधी दिला जाणार आहे. 

‘आयसीटी’तील महत्त्वपूर्ण गोष्टी...
२० महिन्यांत काम पूर्ण करणार, ५ वर्षे देखभाल. 
‘ऑरिक’ केंद्र करणार केंद्रीय पद्धतीने नियंत्रण.
फायबर ऑप्टिकचे जाळे, कंपन्यांना मोठा फायदा. 
वायफायचे मोठे जाळे, ४ एमबीपीएसची गती. 
शासकीय सेवा होणार ऑनलाइन आणि पेपरलेस.
स्मार्ट कार्डच्या माध्यमातून सुविधांचा आढावा. 
सेन्सर्सच्या साहाय्याने अडचणीचा शोध त्वरित. 
आयपीवर आधारित सीसीटीव्हींची करडी नजर. 
पाणी, वीजपुरवठा, पथदिवे थेट ऑरिक कंट्रोल सेंटरशी जोडणार.
घनकचरा व्यवस्थापन कचराही मोजणार. 
जिऑग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या साहाय्याने जागा शोधणे सोपे. 
ऑटोमॅटिक व्हेईकल लोकेशनच्या साहाय्याने वाहनांचे ठिकाण कळणार. 
एव्हीलने पोलिस, रुग्णवाहिका आणि अग्निशामक यंत्रणाही हायटेक. 
सेन्सर तपासणार पर्यावरणाची परिस्थिती. 
स्मार्ट कार्डच्या साहाय्याने बिल पेमेंट, अत्यावश्‍यक सेवांचा लाभ शक्‍य.